रॅपिड रुग्णवाढ...! दुपारी १२ पर्यंतच १८६ !

Foto
अवघ्या अर्ध्या तासात अहवाल देणाऱ्या अँटीजेन टेस्टचा परिणाम आता दिसू लागला असून  रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज दुपारी बारा वाजेपर्यंत संबंध १८६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही ८६५० वर गेली आहे. 
 त्यापैकी ५०६१ जण बरे झाले असून ३५४ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ३२३५ जणांवर उपचार सुरु आहेत. 
शहरात आणखी ६६ रुग्ण
सातारा परिसर ९, मिल कॉर्नर १, वेदांतनगर २, काका चौक, पदमपुरा १, नक्षत्रवाडी २, छावणी ४, पदमपुरा १, कुँवरफल्ली १, इटखेडा ३, पडेगाव १, अशोकनगर, मसनतपूर ८, शिवशंकर कॉलनी ३, सौजन्यनगर १, सारा वैभव, जटवाडा रोड १, एन सहा, सिडको १, एन नऊ,श्रीकृष्णनगर १, जयभवानीनगर १, मुकुंदवाडी १, विठ्ठलनगर १, नागेश्वरवाडी १, उस्मानपुरा १, केसरसिंगपुरा १०, साई बाबा मंदिर परिसर, पदमपुरा २, एन बारा ३, घाटी परिसर २, चिकलठाणा १, चिंचबन कॉलनी २, मीरानगर, पडेगाव १ या भागात रुग्ण आढळून आले. 
ग्रामीण भागात ७ रुग्ण
आयोध्या नगर, बजाजनगर १, बजाजनगर १, गेवराई, दौलताबाद १, कुंभार गल्ली, वैजापूर ४ या भागातील कोरोनाबाधित आहेत.